
नाथ्रेकर स्मृति - प्रतिष्ठान, जालना
स्थापना : सन १९८९, जालना
स्वातंत्र्यसैनिक, संस्कृतपंडित स्व. सखारामपंत नाथ्रेकर गुरुजी यांच्या स्मृत्यर्थ सन १९८९ मध्ये जालना, महाराष्ट्र येथे प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली.
स्व. गुरुजींच्या अद्वितीय कार्याची परंपरा जपणे, त्यांच्या संस्कारांची आणि विचारांची ज्योत पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे, हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. प्रतिष्ठान हे संस्कृत भाषेच्या संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी कटिबद्ध आहे.
संस्कृत ही भारतीय संस्कृतीची जननी आणि ज्ञानपरंपरेची मूळभूत भाषा आहे, या जाणिवेतून प्रतिष्ठान विविध उपक्रम राबवते.
-
संस्कृत पाठांतर स्पर्धा
-
संस्कृत शिक्षणवर्ग
-
संस्कृत संभाषण शिबिरे
-
विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन
-
सांस्कृतिक कार्यक्रम
या माध्यमातून प्रतिष्ठान संस्कृत भाषेची परंपरा जतन करत, आधुनिक पिढीत तिच्याबद्दल प्रेम आणि अभिमान निर्माण करण्याचे कार्य सातत्याने करत आहे.
संपर्क
पत्ता
"शांतसखा", नीळकंठ नगर,
जुना जालना, जालना
महाराष्ट्र ४३१२०३
ई-मेल
स्पर्धांबद्दल चौकशी
+91 8888002871
+91 9422927892
इतर चौकशी
+91 9405060578
+91 9028033395





